परिते : कुरूकलीत वाघ नव्हे बिबट्याच

दिवसभराच्या तपासानंतर तो बिबट्या असल्याचे पुढे आले.
कुरूकलीत वाघ नव्हे बिबट्याच
कुरूकलीत वाघ नव्हे बिबट्याचsakal
Updated on: 

राशिवडे बुद्रुक : परिते- कुरूकली ( ता. करवीर) दरम्यान काल रात्री दहाच्या दिसलेला तो पटेरी वाघ नसून बिबट्या असल्याचे तपासानंतर स्पष्ट झाले आहे. एका पिग्मी एजंटला कोल्हापुर-राधानगरी राज्य मार्ग पार करून गेलेला वाघ असल्याचा भास झाला होता. दिवसभराच्या तपासानंतर तो बिबट्या असल्याचे पुढे आले.

काल बुधवारी रात्री दहाच्या सुमारास भोगावती येथील गजानन महाराज पतसंस्थेचे पिग्मी एजंट शिवाजी टिपुगडे हे कुरुकली कडून पिग्मी घेऊन गावाकडे येत होते. याच वेळी परिते येथील पाटबंधारे कार्यालयाच्या परिसरात असलेल्या दौलत हॉटेल कडे भोगावती नदीकडून अचानक वाघ सदृश्य प्राण्याने झेप घेतली. दोन झेपेतच राज्यमार्ग पार करून तो डोंगराकडे पळाला. यामुळे घाबरलेल्या श्री. टिपुगडे यांनी गावकऱ्यांना सांगितले.

कुरूकलीत वाघ नव्हे बिबट्याच
शरद पवारांच्या सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्यानिमित्त मोफत शिवभोजन थाळी

आज सकाळपासून या परिसरात घबराटीचे वातावरण पसरले होते. वनपाल विजय पाटील यानी परिसराची पाहणी करण्यासाठी रेस्क्यू पथक पाठल्यानंतर तपास सुरू झाला. याबाबत ग्रामस्थाना सतर्क राहण्याच्या सुचना दिल्या व हा तरस असू शकतो असा अंदाज त्यांनी व्यक्त केला मात्र श्री. टिपूगडे यांनी तो फेटाळला.

या घटनास्थळापासून रेस्क्यू टीमचे पथक माग काढीत डोंगराकडे गेले. डोंगराच्या पायथ्याला असलेल्या ऊस लागण केलेल्या वाफ्यात त्यांना ठसे आढळले' शिवाय पुढे एका शेततळ्याच्या काठावरही ठसे आढळले. यावरून येथे बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. या बिबट्याने या परिसरात दोन लांडोरचीही शिकार केल्याचे दिसून आले. डॉ. संतोष वाळवेकर यांच्या या टीम मध्ये ऋषिकेश सुतार, अवधूत कुलकर्णि व अनिल ढोले यांनी काम पाहीले. त्यांना उपसरपंच अजित पाटील, जनार्दन पाटील, मनोज पाटील यांनी सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kolhapur Drought, Six Talukas, District Bank Resolution
32-year-old Vikas Chougale drowned in Kasari River
Pune MLC Election, Graduate Teacher Seats,
Maharashtra sugar season
Marathi News Esakal
www.esakal.com