Kolhapur Tourism : आंबा परिसरात दीड महिन्यात १० हजार पर्यटकांची हजेरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kolhapur Tourism : आंबा परिसरात दीड महिन्यात १० हजार पर्यटकांची हजेरी

Kolhapur Tourism : आंबा परिसरात दीड महिन्यात १० हजार पर्यटकांची हजेरी

आंबा : कोरोनामुळे थंडावलेल्या आंबा, विशाळगड, पावनखिंड परिसर पर्यटनाला हळूहळू बहर येत आहे. व्यवहार सुरळीतपणे सुरू झाले आहेत. सह्याद्रीच्या ‘घाटमाथ्यावरचे उटी’ म्हणून आंबा गिरिस्थानची ओळख आहे. त्यामुळे या निसर्गरम्य परिसरात पर्यटकांचा ओघ वाढू लागला आहे. पर्यटन खुले झाल्यापासून दीड महिन्यांत सुमारे दहा हजारांहून अधिक पर्यटकांनी येथे हजेरी लावली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ओस पडलेली बाजारपेठ भरू लागली आहे. छोट्या मोठ्या हॉटेल्समध्ये पर्यटकांचा ओघ वाढू लागल्याने व्यावसायिकांमध्ये चैतन्य पसरले आहे. हळूहळू त्यांची आर्थिक घडी बसू लागली आहे.

हेही वाचा: आता विभाजीत भारताला अखंडित बनवायला हवं - मोहन भागवत

कातीव कडे, घनदाट जंगल, नागमोडी वळणे, औषधी वनस्पती, पक्ष्यांचा गुंजारव, राज्यप्राणी शेकरू, रानगव्यांचे कळप, महाधनेश पक्ष्याचे दर्शन असा भन्नाट अनुभव घेण्यासाठी पर्यटकांची परिसरात गर्दी होत आहे.

"कोरोनामुळे दोन वर्षांत न भरून निघणारे नुकसान झाले आहे. पर्यटन खुले केले असल्याने पर्यटकांचा ओघ हळूहळू वाढतोय. स्थानिकांच्या हाताला काम आणि रोजगार मिळू लागला. विस्कटलेली आर्थिक घडी बसविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत."

- अशोक कुंभार, स्थानिक हॉटेल व्यावसायिक

"पर्यटन खुले झाल्यापासून पावनखिंड, आंबा, विशाळगड परिसरात पर्यटकांचा ओघ वाढतोय. वन विभागातर्फे निसर्ग माहिती केंद्र, वाघझरा, कोकण दर्शन पॉइंट, विसाव्यासाठी बांधलेले पॅगोडे व जंगल परिसरात पर्यटकांना अधिक सुविधा देण्याचा प्रयत्न आहे."

- अमित भोसले, परिक्षेत्र वन अधिकारी, मलकापूर

हेही वाचा: बापरे! भारत-पाक सामना एवढ्या लोकांनी पाहिला; Viewership चा नवा विक्रम

ठिकाणे अशी

 • अंबेश्वर देवराई

 • कोकण पॉइंट

 • वाघझरा

 • निसर्ग माहिती केंद्र

 • सनसेट पॉइंट

 • विसावा पॉइंट

 • नालाच्या आकाराचे चक्रीवळण

 • गायमुख

 • मानोली डॅम

 • ऐतिहासिक पावनखिंड

 • किल्ले विशाळगड

loading image
go to top