Kolhapur Tourism Development : 'पर्यटनस्थळ व्यवस्थापन'मधून कोल्हापूरला डावलले; सर्व प्रकारची पर्यटनस्थळे असूनही योजनेत समावेश नाही, जिल्ह्याला सापत्न वागणूक

Kolhapur excluded from World Bank tourism scheme : जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने राबविण्यात येणाऱ्या पर्यटनस्थळ व्यवस्थापन संस्था योजनेतून कोल्हापूर जिल्ह्याला वगळण्यात आले आहे. पर्यटन क्षमता असूनही जिल्ह्याला संधी न मिळाल्याने पर्यटन विकासाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
Kolhapur famous tourist places

Kolhapur famous tourist places

esakal

Updated on: 

कोल्हापूर : जागतिक बँकेचे अर्थसहाय्य असणाऱ्या पर्यटनस्थळ व्यवस्थापन संस्था स्थापन करण्याच्या योजनेतून जिल्ह्याला डावलले आहे. सर्व प्रकारची पर्यटनस्थळे असूनही या योजनेत जिल्ह्याचा समावेश (Kolhapur tourism development latest news) नाही. या उलट मोजकी पर्यटनस्थळे असणाऱ्या काही जिल्ह्यांचा यामध्ये समावेश केला आहे. शासनाने अशी सापत्न वागणूक दिल्यास जिल्ह्याचा पर्यटन विकास कसा होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Loading content, please wait...