kolhapur Tourism : राधानगरी-दाजीपूर पर्यटनासाठी पाऊल पडते पुढे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kolhapur Tourism

kolhapur Tourism : राधानगरी-दाजीपूर पर्यटनासाठी पाऊल पडते पुढे

sakal_logo
By
राजू पाटील : सकाळ वृत्तसेवा

राशिवडे बुद्रुक : दीड-दोन वर्षे कोरोनाच्या सावटाखाली असलेली जिल्ह्यातील पर्यटनस्थळे दसऱ्यापासून खुली झाली आहेत. यानिमित्त पर्यटनावर अवलंबून असलेल्या अनेकांचा रोजगार पुन्हा नव्याने सुरू झाला. स्थानिक छोटे-मोठे व्यावसायिक, अनेक घटकांच्या हातांना काम आणि घामाला दाम मिळू लागले आहे. उदरनिर्वाहाचे साधन खुले झाले असून, यातूनच स्थानिक अर्थचक्र सुरू झाले. कोरोना कालावधीनंतर जिल्ह्यातील जंगल, निसर्ग आणि धार्मिक पर्यटन पुन्हा रुळावर येत आहे. याचाच आढावा घेणारी मालिका आजपासून...

हेही वाचा: ST Strike: 'तोपर्यंत अंतरिम वाढीचा पर्याय दिलाय' - अनिल परब

कोरोनानंतर राधानगरी तालुक्यातील पर्यटन मुक्त झाले आहे. इथल्या निसर्गाचा नजराणा मनात साठविण्यासाठी आणि गारवा अनुभवण्यासाठी रोज शेकडो पर्यटक दाजीपूरची वाट धरत आहेत. १ नोव्हेंबरपासून आजपर्यंतच्या २२ दिवसांत सुमारे साडेतीन ते चार हजार पर्यटकांनी भेट दिली. दाजीपूर गव्यांसाठी प्रसिद्ध असले, तरी इथली हिरवाई निसर्गप्रेमींचा आवडता विषय. दोन वर्षांपासून कोरोनामुळे परिसरात प्रवेश बंदी घातल्याने अभयारण्याची वाट अबोल झाली होती. आता पुन्हा परिसरात किलबिलाट वाढला आहे. पर्यटनाचा ओघ वाढल्याने राधानगरी आणि दाजीपूर परिसरातील स्थानिक बाजारपेठा गजबजल्या आहेत.

सप्टेंबरपासून वन्यजीव विभागाने सुरू केलेली कोल्हापूर- दाजीपूर ही बससेवा उत्स्फूर्तपणे सुरू आहे. रोज १७ पर्यटकांना घेऊन येते. राधानगरी जलाशयाला वळसा घालून राऊतवाडीमार्गे राधानगरी धरणाचे दर्शन घेऊन कोल्हापूरला परतते. येणाऱ्या पर्यटकांसाठी स्थानिक युवकांनी ओपन जीप सेवा सुरू केली आहे. रोज आठ ते दहा आणि तितक्याच दाजीपुरातून जीप गाड्या अभयारण्यात जातात. तंबू निवास बुक होऊ लागले आहेत. होम स्टे, हॉटेलमध्ये वर्दळ सुरू झाली आहे.

"दाजीपूर येथे कार्यालय परिसरात व गेट नंबर दोनवर ठक्याचावाडा येथे तंबू निवासाची सोय आहे. पर्यटकांचाही ओघ चांगला असून, त्यांना चांगली सेवा देण्याचे प्रयत्न आहेत. येणाऱ्या पर्यटकांनी जंगलाचे नियम पाळलेच पाहिजेत."

-अजय माळी, वनक्षेत्रपाल, दाजीपूर

"कोरोना काळातील दोन वर्षांत पर्यटन व्यवसाय डबघाईला आला होता. आर्थिक संकट आले होते. आता ही मरगळ झटकल्याने उभारी आली आहे. आमच्या हाताला काम मिळाले."

- रूपेश बोंबाडे, स्थानिक पर्यटन व्यावसायिक

हेही वाचा: केजरीवालांचा बनवाट व्हिडीओ केला शेअर; संबित पात्रांवर कारवाईचे हायकोर्टाचे आदेश

दाजीपूर जंगल सफर गाडीला उत्स्फूर्त प्रतिसाद

 • रोज १७ पर्यटकांचा बसमधून प्रवास

 • वन विभागाच्या महसुलात गतीने वाढ

 • स्थानिक बाजारपेठा गजबजल्या

 • स्थानिक लोकांची आर्थिक उलाढाल वाढली

राधानगरी-दाजीपूरचा निसर्ग खजिना...

 • दाजीपूर गव्यांसाठी प्रसिद्ध

 • हिरवाई

 • जैवविविधता

 • झाडे, वेली, पक्षी, प्राणी

 • फुलपाखरू उद्यान

 • हत्तीमहाल

 • उगवाई मंदिर

 • दाजीपूर माहिती केंद्र

 • राधानगरी जलाशय

 • राऊतवाडी धबधबा

loading image
go to top