Agriculture Market Tax : जीएसटी लागू असताना कृषी उत्पन्न बाजार समितीचा वेगळा सेस आकारणे म्हणजे दुहेरी कर आकारणी असून हा अन्याय तात्काळ थांबवावा, अशी ठाम भूमिका व्यापाऱ्यांनी मांडली.
कोल्हापूर : एलबीटीप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीचा (मार्केट) सेसदेखील हद्दपार करण्यासाठी शासनाला भाग पाडण्याचा निर्धार कोल्हापुरातील बैठकीत व्यापारी - व्यावसायिकांनी आज येथे केला.