esakal | कोल्हापुरात सोमवारपासून दुकाने सुरु होणार; टोपेंचे संकेत
sakal

बोलून बातमी शोधा

Will make committee regarding Bhandara district Hospital Fire said Rajesh Tope

कोल्हापुरात सोमवारपासून दुकाने सुरु होणार; टोपेंचे संकेत

sakal_logo
By
अर्चना बनगे

कोल्हापूर: कोल्हापुरातील (Kolhapur) दुकाने येत्या सोमवारपासून सुरू होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. असे संकेत खुद्द आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh tope) यांनी व्यावसायिकांना दिले आहेत. यामुळे कोल्हापुरातील व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.(kolhapur-traders-shops-opens-from-monday-rajesh-tope-breaking-news-lockdown-update)

कोल्हापुरात या निर्णयामुळे गेल्या १०० दिवसांपेक्षा अधिक दिवसापासून बंद असलेली दुकाने खुली होण्याचा मार्ग कोल्हापुरकरांसाठी मोकळा झाला आहे.आज सकाळी व्यापाऱ्यांनी आरोग्य मंत्र्यांची भेट घेऊन दुकाने सुरू करण्याची मागणी केली. यावर राजेश टोपे यांनी व्यापाऱ्यांना दुकाने सुरू करण्याबाबत आदेश लवकरच काढला जाईल असे आश्वासन दिले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील covid-19 पॉझिटिव दर कमी आल्याने येथील दुकाने सोमवारपासून सुरू होण्याची चिन्हे निर्माण झाली त्याचे संकेत खुद्द आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना दिले आहेत.

loading image