

Kolhapur Traffic Congestion Worsens
sakal
कोल्हापूर : शहरातील अधिकतर एका घरात किमान तीन वाहने, अरुंद रस्ते, बेशिस्त पार्किंग, वाहनांची वेगाने वाढणारी संख्या यातून निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीच्या प्रश्नाने शहर घुसमटले आहे. ही समस्या सोडविण्यासाठी उड्डाणपूल आणि पादचारी भुयारी मार्गांची सातत्याने लोकप्रतिनिधी, प्रशासनाच्या पातळीवर चर्चा केली जाते; पण ते प्रत्यक्षात साकारण्याची कार्यवाही होत नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या दिवसागणिक गंभीर बनत असताना हे उड्डाणपूल, भुयारी मार्ग कागदावरच आहेत.
- संतोष मिठारी