

Kolhapur Girl End Life news
esakal
Exam Failure Fear Student Death : इयत्ता नववीची परीक्षा अनुत्तीर्ण होण्याच्या भीतीने कल्याणी बाबासाहेब सोनवडेकर (वय १५, रा. पाडळी खुर्द, ता. करवीर) हिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी (ता. १) सकाळी दहाच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. अनुत्तीर्ण होण्याची भीतीने तिने खोलीतच स्वतःला संपवले. याची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली.