
Kolhapur Healthcare Issue : ‘रात्री डॉक्टर नव्हते, रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध झाली नाही. यामुळे वेळेत उपचार होऊ न शकल्यामुळे बाळ दगावले,’ असे आरोप करत येथील आरोग्य उपकेंद्रात नातेवाइकांनी दवाखान्याच्या पायरीवर ठिय्या मांडला. सांगरूळ (ता. करवीर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामधून सीपीआरला पाठवलेल्या महिलेच्या प्रसूतीवेळी बाळ दगावल्याने नातेवाइकांनी आरोग्य उपकेंद्रात गोंधळ घातला.