
दिवाळीसारख्या आनंदाच्या सणात कोल्हापुरात अपघातांची मालिका सुरू असून केवळ दोन दिवसांत चार जणांचा मृत्यू झाला आहे.
esakal
Kolhapur Panhala Accident : पन्हाळा तालुक्यातील कळे येथे मोटारसायकल व टेंपोच्या अपघातात सुळे (ता. पन्हाळा) येथील प्रणव सर्जेराव पाटील (वय १८) या युवकाचा मृत्यू झाला. प्रणव व त्याचा मित्र (नाव समजले नाही) कळे येथे काही कामानिमित्त मोटारसायकलवरून येत होते.