
कोल्हापूर : जिल्ह्यातील मोठी शहरे असलेल्या कोल्हापूर आणि इचलकरंजीत अवैध व्यवसायांचे माहेरघर झाले आहे. गोवा राज्यात कॅसिनो खेळण्यासाठी जाणाऱ्यांची व्यवस्था जिल्ह्यातच लावण्याच्या हालचाली आहेत, तर इचलकरंजीत ‘चिमणी पाखरं’ नावाचा नवा प्रकारचा जुगार शाळकरी मुलांपर्यंत पोहोचला आहे. मटका, जुगारात घरदारावर कर्जाचा बोजा करून ठेवलेल्यांची पावले आता कॅसिनोकडे वळत आहेत.