

Kolhapur Oxygen Cylinder Blast
esakal
कोल्हापूर: शिवाजी उद्यमनगर येथील उचगावकर आयर्न वर्क्समध्ये आज सायंकाळी पावणेसातच्या सुमारास झालेल्या ऑक्सिजन सिलिंडरच्या स्फोटाने परिसर हादरून गेला. यात कारखान्याचे पत्र्याचे शेड उडून त्याचा चक्काचूर झाला. कामगारांची सुटी झाल्यानंतर काही वेळातच हा प्रकार घडल्याने मोठी दुर्घटना टळली.