
कोल्हापुरातील अनोखी परंपरा पाहून सर्वजण थक्क! यामाहाच्या मागे नटलेल्या म्हशींचा रोड शो, गावात उत्साहाचं वातावरण...
esakal
Buffaloes Behind Yamaha : रंगवलेली शिंगे, गळ्यात बांधलेली घुंगरं, मण्यांची झुल व फुलांचा हार घालून सजविलेल्या म्हशींचा रोड शो आज (ता. २२) संपन्न झाला. शहरातील पंचगंगा नदी घाट, कसबा बावड्यातील भाजी मार्केट व गवळी गल्लीत म्हशी पळवण्याचा थरारक अनुभव पहायला मिळतो. दिवाळी पाडव्याला म्हशींना सजवून त्यांचा रोड शो करण्याची परंपरा आजही जोपासली गेली आहे.