Dhamane village road accident Ajara
esakal
उत्तूर (जि. कोल्हापूर) : ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा हूक तुटून झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघे जण ठार झाले. महादेव दिनकर करवळ (वय ४९, रा. सोनारवाडी, ता. भुदरगड) व बचाराम शिवाजी सुतार (६५, रा. मिणचे खुर्द, ता. भुदरगड) अशी त्यांची नावे आहेत. दोघेही संताजी घोरपडे साखर कारखान्याचे कर्मचारी होते. गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास धामणे (ता. आजरा) गावाजवळ हा अपघात (Two killed in tractor trolley accident) झाला. अपघातानंतर ट्रॉलीही शेजारील शेतात उलटली. घटनेनंतर चालक पळून गेला.