Kolhpaur vidhanparishad Election : नगरसेवक-सदस्यांत उचलीवरून ‘फरक’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

zilla parishad kolhapur

Kolhpaur vidhanparishad Election : नगरसेवक-सदस्यांत उचलीवरून ‘फरक’

कोल्‍हापूर : सुरुवातीला एकतर्फी वाटणारी विधान परिषदेची निवडणूक सध्यातरी घासून चालली आहे. मतदारांच्या भेटीगाठीसाठी उमेदवार व त्यांचे समर्थक रात्रीचा दिवस करत आहेत. नेते भेटीला येत असल्याने मतदारांचा ‘भाव’ चांगलाच वधारला आहे. ही संधी परत नसल्याचा अंदाज असल्याने मागण्यांची ‘लिस्टच’ दिली जात आहे. जिल्‍हा परिषद, नगरपालिकांचा कार्यकालही संपत आल्याने मतदारही ‘आडपडदा’ न ठेवता मोकळेपणाने चर्चा करत आहेत. या मागण्यांनी कारभारी समर्थक मात्र चक्रावले आहेत. यातच पहिली उचल देताना नगरसेवक व सदस्यांत फरक पडल्याने नाराजी पसरली आहे. ती दूर करताना उमेदवारांची दमछाक होत आहे.

हेही वाचा: प्रवाशांना त्रास होऊ नये यासाठी ST संपकऱ्यांशी चर्चा करुन तोडगा काढा - HC

जिल्‍ह्याचे राजकीय वातावरण ऐन थंडीतही गरम होऊ लागले. मागील चार, पाच दिवसांत संपूर्ण जिल्‍हा ढवळून निघाला आहे. एकेका मतदारासाठी सात ते आठ ठिकाणाहून फिल्‍डिंग लावली आहे. पक्षांच्या मतापेक्षा गटातटाच्या मतदारांना सर्वाधिक भाव आला आहे. आगामी निवडणुकांमध्ये या गटांना विविध ठिकाणी संधी देणे, त्यांच्या निवडणुकांना रसद पुरवणे, विकास कामांसाठी निधी देणे आणि त्याहीपुढे या निवडणुकीतही ‘महाप्रसाद’ देण्याची मागणी केली जात आहे. शक्य तितके जिल्‍ह्यातील नेत्यांची कोंडी करण्याचा प्रयत्‍न पाहायला मिळत आहे. नेत्यांनी वारंवार भेटी देऊनही काही गटांनी अजून पत्ते खोलले नाहीत. जेवढा पाठिंब्याला उशीर तेवढा ‘भाव’ जादा, हा पूर्वीचा अनुभव असल्याने ताणाताण सुरू आहे. मात्र ताणले तर तुटण्याची भीतीही आहे.

विमान प्रवास नाही तर...

मागील काही विधान परिषद निवडणुकांमध्ये मतदारांना सहकुटुंब विदेश सहलीची संधी दिल्याचे सांगून यावेळीदेखील अशी संधी देण्याची मागणी होत असल्याचे सदस्यांनी सांगितले. कोरोनामुळे विदेश सहलीवर मर्यादा आहेत. सहलीतही राजकीय अडथळे येऊ नयेत यासाठी आपलीच सत्ता असलेल्या ठिकाणी मतदारांची सोय केली जात आहे. विशेद सहलीचा प्रश्‍‍न निकाली निघाल्याने देशांतर्गत दूरवरचा विमान प्रवास करावा, अशी मागणी होत असल्याचे सदस्य सांगत आहेत.

मत एक ‘फरक’ वेगळा

नगरसेवक, सभापती व जिल्‍हा परिषद सदस्यांचे मतदान आहे. नगरसेवक ३ ते ५ हजार मतदानातून निवडून येतो. पंचायत समिती सदस्य २० हजार तर जिल्‍हा परिषद सदस्य ४० हजार मतांतून निवडून येतो. असे असताना नगरसेवक व सदस्यांच्या उचलीत फरक का, उलट जिल्‍हा परिषद सदस्याला चांगला ‘भाव’ मिळाला पाहिजे, अशी मागणी केली जात आहे.

हेही वाचा: सत्ताधीशांनी दररोज आत्मपरीक्षण करावे: सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा

मत एक ‘फरक’ वेगळा

नगरसेवक, सभापती व जिल्‍हा परिषद सदस्यांचे मतदान आहे. नगरसेवक ३ ते ५ हजार मतदानातून निवडून येतो. पंचायत समिती सदस्य २० हजार तर जिल्‍हा परिषद सदस्य ४० हजार मतांतून निवडून येतो. असे असताना नगरसेवक व सदस्यांच्या उचलीत फरक का, उलट जिल्‍हा परिषद सदस्याला चांगला ‘भाव’ मिळाला पाहिजे, अशी मागणी केली जात आहे.

loading image
go to top