

Candidates and supporters react emotionally during vote counting at Gandhi Maidan centre in Kolhapur.
sakal
कोल्हापूर : विजयाचा आनंद, निकालाची उत्सुकता आणि पराभवाचे शल्य अशा संमिश्र भावना गांधी मैदान मतमोजणी केंद्रावर दिवसभर अनुभवायला मिळाल्या. या केंद्रावर तीन प्रभागांची मतमोजणी झाली. बहुतांश वेळेस वातावरण शांत आणि शिस्तबद्ध होते. काही अपवादात्मक क्षण वगळता मतमोजणी प्रक्रिया सुरळीत झाली.