.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Kolhapur Panchaganga River: राज्यातील पश्चिम महाराष्ट्रात सध्या जोरदार पाऊस सुरु आहे. घाटमाथ्यावर तर चांगला पाऊस बरसतो आहे. त्याचा परिणाम म्हणून नद्यांच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. कोल्हापुरातही पाऊस सुरु आहे. पण पंचगंगा नदीची पाणीपातळी स्थिर होती. तरीही या नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असल्याची खोटी माहिती चक्क जिल्हा प्रशासनानं दिल्यानं खळबळ उडाली. अशा प्रकारे खोटी माहिती जनतेला पुरवून मोठी गंभीर घटना ओढवून घेण्याचा प्रकार घडल्यानं याप्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कडक कारवाईची मागणी केली जात आहे.