
गडहिंग्लज : निष्काळजीपणाचे उत्तम उदाहरण म्हणून गडहिंग्लज पाटबंधारे विभागाकडे पहावे लागेल. सर्वात आधी पाणी अडवण्याची कार्यवाही करूनही केवळ गळतीकडे दुर्लक्ष केल्याने दहा दिवसांतच हिरण्यकेशी नदीवरील जरळी बंधाऱ्यातून ५० एमसीएफटी म्हणजेच अडवलेल्यातील ५० टक्के पाणीसाठा गायब झाला आहे.