Sangli : बुधगावातला पाणीदार खजिना लुप्त होण्याच्या मार्गावर

संस्थानकालीन विहिरी आणि खणी जपण्याची गरज
Kolhapur
KolhapurSakal

माधवनगर : एखादं गाव सहजासहजी वसत नाही. त्याच्या वसण्यामागं शेकडो वर्षांचा इतिहास, परंपरा, निसर्गसंपदा उभी असते. हीच त्या त्या गावाची खरी ओळख असते. ही ओळख जपण्याची, ती आणखी समृद्ध करण्याची जबाबदारी गावच्या नव्या पिढ्यांची असते. बुधगाव हे तर संस्थानकालीन गाव. गावाला मोठा इतिहास. या गावात आजही अनेक संस्थानकालीन इमारती तशाच अनेक देखण्या-बांधीव विहिरी आणि खणीही आहेत. फक्त काळाच्या ओघात हा पाणीदार खजिना लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. कधी काळी पंचक्रोशीला पाणी देणाऱ्या या विहिरी आणि खणी जपण्याची गरज आहे.

सांगली शेजारचं बुधगाव हे गाव जेव्हा कधी दोन अडीचशे वर्षांपूर्वी वसलं असेल तेव्हा त्याकाळीही तेव्हाच्या माणसांनी पुढच्या पिढ्यांसाठी पाण्याचा विचार करून ठेवला होता. गावात असलेल्या तब्बल ३०-४० विहिरी त्याच्या साक्षीदार म्हणून आजही आस्तित्वात आहेत. कोरीव दगडांच्या सुबक बांधकामात तयार केलेल्या या विहिरींचं सौंदर्य आता पडझडीमुळं, अतिक्रमण, कचरा टाकल्यामुळं संपत चाललं असलं तरी ते दडून रहात नाही. जे शिल्लक आहे ते आजही बघण्यासारखं आहे.

Kolhapur
देशात कोरोना, बॉलीवूड चाललं मालदीवला

विहिरींमधून आजही पाण्याचा स्रोत जिवंत आहे. फक्त त्याचा ओपसा व्हायला हवा. कचरा टाकून विहिरी मुजवून टाकणं सोपं आहे, पण एकदा हा खजिना जमिनीखाली गेला तर तो पुन्हा वरती आणनं अशक्य होणार आहे. या विहिरींसारखी विहीर काढणं या काळात अगदी अशक्य आहे, म्हणूनच आहे त्या विहिरी जपायची गरज आहे. गावात

Kolhapur
दानापुरातील दलित कुटुंब गावात परतली !; पाहा व्हिडीओ

विहिरींसोबत गावात दोन खणीही आहेत. गावातील संस्थानकालीन इमारती बांधण्यासाठी जो दगड लागला तो या खणीतून मिळाला होता. पण आता या खणींची अवस्थाही बिकटच आहे.

सांगलीनगरीतही अनेक विहिरी होत्या, पण विकासाच्या नादात सांगलीकरांनी त्या दगड माती कचऱ्यांनी कायमच्या मातीत गाडून टाकल्या. माधवनगरमध्ये घरटी एक पाण्याचा आड होता. माधवनगरकरांनी मात्र हा खजिना जपला आहे. बुधगाव ग्रामपंचायतीनेही आता या विहिरीतला गाळ काढणं, डागडूजी करणं यासारखी मोहीम लोकसहभागातून हाती घ्यायची गरज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com