Kolhapur Police Raid : मुंबई-पुण्यातून आणल्या जायच्या महिला; व्हॉट्सॲप ग्रुप करून वाशीतील लॉजमध्ये सुरू होता वेश्‍याव्यवसाय, हायप्रोफाईल रॅकेटचा पोलिसांकडून पर्दाफाश

Kolhapur WhatsApp prostitution racket : करवीर पोलिसांनी व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून चालणाऱ्या कथित देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश केला. दोन आरोपींना अटक झाली असून एका महिलेची सुटका करण्यात आली आहे.
Kolhapur WhatsApp prostitution racket latest news

Kolhapur Police conducting a raid at a lodge in Vashi during a crime investigation

esakal

Updated on

कोल्हापूर\सोनाळी : व्हॉट्सॲप ग्रुप तयार करून त्याद्वारे सुरू असलेल्या हायप्रोफाईल वेश्‍याव्यवसायाचे रॅकेट करवीर पोलिसांनी उघड (Karveer Police prostitution raid) केले. त्यात सागर प्रभाकर कांबळे (वय ४०, मिणचे बुद्रुक, ता. भुदरगड), कमलेश कृष्णा पाटील (वय ३५, हेळेवाडी, ता. राधानगरी) या संशयित आरोपींना अटक करण्यात आली, तर शहाजी एकनाथ वैद्य ऊर्फ सागर पाटील (हेदवडे, ता. भुदरगड), सुहास निचिते (सोळांकूर, ता. राधानगरी), विक्रम कांबळे (कासारवाडा, ता. राधानगरी) हे आरोपी अद्याप पसार आहेत. यातील पीडित महिलेची सुटका करण्यात आली. पुणे-मुंबईतून महिलांना आणून हा व्यवसाय सुरू होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com