
कोल्हापूर : पंचगंगा नदीचा महापूर कायमचा दूर व्हावा आणि नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी पर्यावरण मंत्रालयाच्या माध्यमातून काम करणार आहे. या प्रश्नासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेणार आहे, असे आश्वासन पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी आज येथे दिले. त्यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.