
Kolhapur Honeytrap
esakal
Honeytrap Blackmailing Kolhapur : डिपफेक तंत्रज्ञानाचा उपयोग करून चेहरा किंवा खोटा आवाज तयार करत ब्लॅकमेल किंवा आर्थिक फसवणुका होत आहेत. तसेच हनी ट्रॅपमध्ये आकर्षक प्रोफाईल तयार करून लोकांना भावनिक जाळ्यात फसवले जात आहे. आपल्या सामाजिक प्रतिष्ठेला धक्का बसण्याच्या भीतीने अनेक जण तातडीने पैसे देऊ करतात. सायबर चोरट्यांनीही लोकांच्या भीतीचा फायदा घेणारी ही लुटीची पद्धत अवलंबली आहे.