Kolhapur Woman Police Officer
esakal
पट्टणकोडोली (कोल्हापूर) : मनात प्रबळ इच्छाशक्ती असेल तर कोणतेही स्वप्न अशक्य राहत नाही, याचं उत्तम उदाहरण म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्याच्या इंगळी गावची कन्या आरती कणिरे (Kolhapur woman PSI). शिक्षणात खंड, संसाराची जबाबदारी, वयाची अट आणि कोरोनासारखी संकटे पार करत आरती कणिरे यांनी वयाच्या ४० व्या वर्षी पोलिस उपनिरीक्षक होण्याचा मान नुकताच मिळवला.