
Kolhapur Youth Clash
esakal
संशयितांचे पोलिस रेकॉर्ड
आदित्य गवळी : प्राणघातक हल्ला, मारामारी, दमदाटीप्रकरणी चार गुन्हे दाखल
धीरज राजेश शर्मा : अमली पदार्थ बाळगणे, प्राणघातक हल्ला, मारामारीसारखे पाच गुन्हे दाखल
ऋषभ ऊर्फ मगर साळोखे ः खून, खुनाचा प्रयत्न, मारामारीसारखे १० गंभीर गुन्हे दाखल
सद्दाम सरदार कुंडले ः खुनाचा प्रयत्न, अपहरण, मारामारीचे पाच गुन्हे दाखल
Kolhapur Youth Clash News : महागडे कपडे... विनानंबर प्लेट दुचाकी...व्यसनांचे उदात्तीकरण ...टोळक्यासोबत दहशत...हत्यारांच्या जोरावर दमदाटीचे रिल्स असे गुन्हेगारीचे नवे रूप समोर आले आहे. स्टेटस्वरून एकमेकांना खुन्नस देत थेट आव्हाने दिली जात आहेत. फुलेवाडी रिंगरोड हा आता गुन्हेगारांचा नवा अड्डा बनला असून ‘गँगवॉर’ वेळीच मोडीत काढण्यासाठी पोलिसांना ठोस पावले उचलावी लागणार आहेत. शुक्रवारी रात्री झालेल्या महेश राख याच्या खुनातील संशयितांवर आता ‘मोका’ प्रस्तावाची तयारी पोलिसांनी सुरू केली आहे.