Kolhapur ZP Promotions : ZP शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार! चुकीच्या पदोन्नत्यांवर पालकमंत्र्यांची मोठी कारवाई; 211 शिक्षकांचे पदोन्नती आदेश रद्द

Why Were 211 Kolhapur ZP Promotions Cancelled? कोल्हापूर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातील २११ पदोन्नत्या नियमबाह्य झाल्याच्या तक्रारीनंतर पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी त्या तत्काळ रद्द करून संपूर्ण प्रक्रियेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
Kolhapur Zilla Parishad teacher promotion controversy

Kolhapur Zilla Parishad teacher promotion controversy

esakal

Updated on

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून केंद्रप्रमुख आणि मुख्याध्यापक म्हणून पदोन्नती दिली आहे. ही पदोन्नती देताना चुकीच्या पद्धतीने आणि नियमबाह्यरीत्या दिली असल्याच्या तक्रारीवरून पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी २११ जणांची पदोन्नती तत्काळ रद्द करून चौकशी करण्याचे आदेश दिले (Kolhapur ZP 211 promotions cancelled) आहेत. जिल्हा परिषदेत मनमानीपणा खपवून घेतला जाणार नाही, अशा इशारा शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर यांना पालकमंत्री आबिटकर यांनी दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com