
Kolhapur Politics : कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या कार्यक्रम वेळापत्रकानुसार मतदारसंघाचा प्रारूप आराखडा उद्या (ता. १४) प्रसिद्ध होणार आहे. सर्व तहसील कार्यालयात दुपारी १२ वा. पर्यंत प्रारूप आराखडा लावण्यात येणार आहे. नागरिकांनी तहसील कार्यालयातच हरकती जमा करायच्या आहेत. कळंबा किंवा पाचगाव स्वतंत्र मतदारसंघ होण्याची चर्चा असून, माळ्याची शिरोली तसेच कागल तालुक्यातील बागणी मतदारसंघही स्वतंत्र होण्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषदेचा निवडणूक कार्यक्रम जूनमध्ये जाहीर करण्यात आला. त्याप्रमाणे सोमवारी सर्व तहसील कार्यालयांत आराखडा जाहीर करण्यात येईल.