

Senior Mahayuti leaders during a key meeting on Kolhapur Zilla Parishad seat sharing.
sakal
कोल्हापूर : ज्या ठिकाणी शक्य असेल तेथे महायुती म्हणून जिल्हा परिषद निवडणूक लढू. ज्या ठिकाणी जागा वाटप शक्य नाही, तेथे मैत्रीपूर्ण लढत करू, अशी भूमिका महायुतीमधील सर्वच नेत्यांनी घेतली. आज महायुतीच्या जागा वाटपासंदर्भात पहिली बैठक झाली. यामध्ये काही नेत्यांनी तर स्वबळाचीच भाषा केली.