
कोल्हापूर जिल्हा परिषदेचे तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलंबित
esakal
Kolhapur Political News : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव यांना मंगळवारी निलंबित करण्यात आले. या संदर्भातील आदेश राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाचे उपसचिव सुभाष इंगळे यांनी काढले आहेत. कोल्हापूर जिल्हा परिषदेत कार्य करत असताना तीर्थक्षेत्र योजनेतील आर्थिक अनियमितता आणि पुराव्यांमध्ये खाडाखोड केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.