

kolhapur zp
sakal
कोल्हापूर : जिल्हा परिषद कोल्हापूरच्या विषय समित्यांवरील सभापतिपदांच्या वाटपाबाबत महायुतीत महत्त्वाचा फॉर्म्युला आज निश्चित करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसला महिला व बालकल्याण सभापती, शिवसेना शिंदे गटाला बांधकाम आणि आरोग्य सभापती, जनसुराज्य शिक्षण आणि अर्थ सभापती, राजर्षी शाहू आघाडीला समाज कल्याण सभापतिपद देण्याचा फॉर्म्युला ठरविला आहे. येथील शासकीय विश्रामगृहात महायुतीच्या प्रमुख नेते आणि मंत्र्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सोमवारी (ता. ३०) होणाऱ्या सभापतींच्या निवडी एक वर्षासाठी असणार आहेत.