esakal | Kolhapur ZP Election 2021:कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे राहुल पाटील, उपाध्यक्षपदी जयवंतराव शिंपी
sakal

बोलून बातमी शोधा

ZP President Election Decision In Goa By Mahavikas Aghadi Kolhapur Marathi News

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे राहुल पाटील

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

कोल्हापूर: जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी आमदार सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या बैठकीत अध्यक्ष पदासाठी राहूल पाटील तर उपाध्यक्षपदी जयवंत शिंपी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.जिल्हा परिषदेच्या (z p president,vice presiden election 2021) अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणूक आज दुपारी होणार आहे. मात्र सत्ताधारी आणि विरोधक दोघांनीही अद्याप आपल्या उमेदवारांची नावे गुलदस्त्यात ठेवली होती. kolhapur-zp-election-2021-congress-nominates-rahul-patil-for-president-post-kolhapur-news

हेही वाचा- आज फैसला; वर्णी कोणाची?सत्ताधारी ,विरोधक उमेदवारांची नावे गुलदस्त्यात

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असणाऱ्या नाट्यमय घडामोडींमुळे ही निवडणुकीची उस्तुकता शिगेला पोहचली आहे. अध्यक्ष पदासाठी काँग्रेसकडून राहुल पाटील यांचे नाव आघाडीवर होते.आज (ता. १२) दुपारी २ वाजता जिल्हा परिषदेच्या सभेमध्ये मतदान होऊन त्यानंतर निवड केली जाणार आहे.मात्र अद्याप महाविकास आघाडीने आपल्या उमेदवारीचे नाव जाहीर केलेले नाही.

loading image