esakal | कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांवर शिवसेना , अपक्ष सदस्याला संधी
sakal

बोलून बातमी शोधा

Kolhapur ZP:  विषय समित्यांवर शिवसेना , अपक्ष सदस्याला संधी

Kolhapur ZP: विषय समित्यांवर शिवसेना , अपक्ष सदस्याला संधी

sakal_logo
By
सुनील पाटील -सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : शिवसेनेच्या (Shivsena) तीन व अपक्ष एका जिल्हा परिषद (kolhapur zp election 2021) सदस्यांना विषय समिती सभापतींपदी संधी देण्यात आली. पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्यासह इतर नेत्यांची शासकीय विश्रामगृहात सकाळी बैठक झाली. यामध्ये सर्वानूमते ही नावे घोषित करण्यात आली. दरम्यान,भाजपकडून विषय समितीसाठी अर्ज दाखल केला जाणार नसल्याने विषय समिती सभापती म्हणून चारही सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे.

खासदार संजय मंडलिक यांच्या गटाच्या शिवानी भोसले यांना महिल व बालकल्याण, आमदार प्रकाश आबिटकर गटाच्या वंदना जाधव यांना आरोग्य व बांधकाम समिती सभापती तर माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या गटाच्या कोमल मिसाळ यांना समाज कल्याण चार पैकी तीन समित्यांवर शिवसेनेच्या सदस्यांना सभापती पद मिळाले आहे. तर, अपक्ष रसिका अमर पाटील यांना शिक्षण व अर्थ समिती सभापती म्हणून घोषित करण्यात आले.

हेही वाचा- जाणून घ्या: काय आहे ‘पन्हाळा,पावनखिंड पदभ्रमंती’मोहीम?

काल जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष म्हणून कॉंग्रेसचे राहूल पाटील यांची तर उपाध्यपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जयवंतराव शिंपी यांची निवड करण्यात आली. त्यानंतर कालच विषय समिती सभापती म्हणून चार ही महिलांची नावे घोषित केली होती. आज कोणाला कोणते खाते मिळणार यासाठी सर्व नेत्यांनी सकाळीच शासकीय विश्रामगृहात बैठक घेवून यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. दरम्यान, जिल्हा परिषदेमध्ये याची घोषणा झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत आपआपल्या नेत्यांचा जयघोष केला.

loading image