Kolhapur election: ऐन थंडीत राजकीय तापमान चढले! इच्छुकांकडून आश्वासनांचा पाऊस, मतदार मात्र विचारतायत ‘काम कुठे?’
Kolhapur politics: थंडीच्या झुळुकीत कोल्हापूरचे राजकारण तापले आहे! जिल्हा परिषदेचे इच्छुक उमेदवार आश्वासने, कार्यक्रम आणि भावनिक आवाहनांचा वर्षाव करत असताना मतदार मात्र खऱ्या कामाचा हिशेब मागत आहेत.
कोल्हापूर: जिल्हा परिषदेच्या आरक्षणाची घोषणा होताच जिल्ह्याच्या राजकारणात निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. मतदानाच्या तारखांची घोषणा अद्याप बाकी असली, तरी इच्छुक उमेदवारांच्या जोडण्या सुरू झाल्या आहेत.