
ZP Candidate List 2025 : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचे वारे जोर धरू लागले आहेत. जिल्ह्यातील तब्बल ६८ जिल्हा परिषद मतदारसंघांमध्ये कोणते आरक्षण जाहीर होणार, याकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे. याच आरक्षणाच्या आधारे उमेदवार निवड आणि त्यानंतरचे राजकीय डावपेच ठरणार आहेत. आरक्षणानंतर उमेदवारीसाठी झुंबड उडणार आहे. महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातील लढत यावेळी अत्यंत चुरशीची होणार आहे. मात्र, महायुतीतील नेते आणि विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या गर्दीत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय मिळणार का, याचीच जोरदार चर्चा सुरू आहे.