esakal | कोल्हापूर: मेघोली फुटल्याने वेदगंगाच्या पातळीत ४ फुटांनी वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

kolhapur

कोल्हापूर: मेघोली फुटल्याने वेदगंगाच्या पातळीत ४ फुटांनी वाढ

sakal_logo
By
टीम ई सकाळ

जत्राट: भुदरगड तालुक्यातील मेघोली तलाव बुधवारी (ता. 1) फुटल्याने निपाणी भागातून वाहणारया वेदगंगा नदीचे पाणी गढूळ झाले असून पाणीपातळीत चार फुटाने वाढ झाली आहे. अचानक नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने नदीकाठावर असलेल्या काही शेतकरयांच्या विद्युत मोटारी पाण्यात बुडाल्या आहेत. त्यामुळे त्यांना आर्थिक फटक बसला आहे.

हेही वाचा: ...तर आमरण उपोषण करावे लागेल; श्रमिक कामगार संघटनेचा इशारा

महापुराने नदीकाठावरील वीज खांब व ट्रान्सफार्मर पडल्याने अद्याप काही भागात हेस्कॉमतर्फे दुरुस्तीचे काम सुरु आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यापासून नदीकाठावरील वीज पुरवठा खंडीत झाला आहे. नदीत कपडे धुण्यासाठी महिलांची रोज वर्दळ असते. पण पाणी गढूळ झाल्याने कपडे धुण्याची समस्याही उदभवली आहे.

वेदगंगा नदीकाठावरील अनेक गावात शेतीसह पिण्याच्या पाण्यासाठी नळपाणी पुरवठा योजना राबविली आहे. नदीचे पाणी गढूळ झाल्याने पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला असून पिण्याच्या पाण्यासाठी काही भागात पर्यायी व्यवस्था करावी लागत आहे. त्यामुळे ऐन कामाच्या हंगामात महिलांसह नागरिकांची कसरत होत आहे. सध्या नदीत वाहते पाणी असल्याने दोन दिवसात पाणी पुन्हा शुद्ध होईल, असा शेतकरयांचा अंदाज आहे आहे.

loading image
go to top