esakal | ...तर आमरण उपोषण करावे लागेल; श्रमिक कामगार संघटनेचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

...तर आमरण उपोषण करावे लागेल; श्रमिक कामगार संघटनेचा इशारा

रेंदाळ, पट्टणकोडोली आदी ग्रामपंचायतींनी मागील ८ महिन्यांपासून पगार दिलेला नाही. त्यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.

...तर आमरण उपोषण करावे लागेल; श्रमिक कामगार संघटनेचा इशारा

sakal_logo
By
सदानंद पाटील

कोल्हापूर : शासन निर्णयाप्रमाणे ऑगस्ट २०२० पासून ग्रामपंचायत कामगारांना किमान वेतनाप्रमाणे पगार दिला जात नाही. वारंवार आदेश देवूनही कार्यवाही होत नाही. जर वरील निर्णयांची अंमलबजावणी झाली नाही, तर आमरण उपोषण करावे लागेल, असा इशारा श्रमिक जनरल कामगार संघटनेने दिला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

निवेदनात म्हटले आहे, ग्रामपंचायतींनी कर्मचाऱ्यांना किमान वेतन देणे आवश्यक आहे. मात्र कबनूर, शिरोली पुलाची, रेंदाळ, यळगुड या सर्वच ग्रामपंचायतीनी कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम पगारातून कपात करूनसुद्धा कामगारांच्या खात्यावर जमा केलेली नाही. तसेच सेवा पुस्तकेही अद्ययावत केलेली नाहीत.

हेही वाचा: 'अनिल परबांचे बांधकाम वाचवून दाखवाच!'

मुळात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तुटपुंजा पगार आहे. मात्र तोसुद्धा वेळेवर दिला जात नाही. रेंदाळ, पट्टणकोडोली आदी ग्रामपंचायतींनी मागील ८ महिन्यांपासून पगार दिलेला नाही. त्यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. अनेक कर्मचारी ५ ते ७ वर्षे नोकरी करत आहेत. तरीही त्यांना अद्याप नोकरीत कायम केलेले नाही. अनेक कामगारांना हक्काच्या आजारपणाच्या रजा दिल्या जात नाहीत. जिल्हा परिषदेने आदेश देऊनही कोरोना काळातील प्रोत्साहन भत्ता अनेक ग्रामपंचायतींनी दिलेले नाही.

एकूणच ग्रामपंचायत स्तरावर कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे. जर वरील मागण्यांबाबत योग्य ती कार्यवाही झाली नाही, तर आमरण उपोषण, बेमुदत संप यासारख्या मार्गाचा अवलंब करावा लागेल, असा इशारा देण्यात आला. कॉ. जयश्री पाटील, कॉ. औदुंबर साठे, कॉ. सुकुमार कांबळे, कॉ. आप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले.

हेही वाचा: भारत-रशिया मैत्री काळाच्या कसोटीवर ठरली खरी - PM मोदी

loading image
go to top