
सुनील पाटील
काेल्हापूर : जिल्हा क्षयमुक्त करण्यासाठी आरोग्य विभागाकडून चांगले प्रयत्न केले जात आहेत. राज्यात कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक ३५९ ग्रामपंचायती क्षयरोगमुक्त झाल्या आहेत. यात ५० ग्रामपंचायतींना रौप्यपदक तर ३०९ ग्रामपंचायतींना कांस्यपदक प्रमाणपत्र मिळाले आहे. भविष्यात जिल्ह्यातील ग्रामपंचायती सुवर्णपदक प्रमाणपत्रासाठी पात्र करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग पुढाकार घेतला आहे. दरम्यान, जिल्ह्यात असणाऱ्या १०७० रुग्णांना क्षयरोगमुक्त करण्यासाठी प्रयत्न केले आहेत.