कोवीड योद्धे पुरस्कार देण्याआधीच गाजले

Kovid warriors roared even before the award was given
Kovid warriors roared even before the award was given
Updated on

कोल्हापूर ः आरोग्य विभागातर्फे देण्यात येणारे कोविड योद्धा पुरस्कारांचा वाद थांबण्याची शक्‍यता दिसत नाही. पहिल्यांदा ही यादी परस्परच तयार केल्याचा आरोप कर्मचारी व सदस्यांनी केला होता. यात मर्जीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश झाल्याची टीका झाली. विशेषत: करवीर तालुक्‍यातून दिलेल्या नावांवर जोरदार खडाजंगी चर्चा कारभाऱ्यांनी आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांच्या दालनात घडवून आणली होती. यानंतर समितीच्या मान्यतेने 78 अधिकारी, कर्मचाऱ्यांची शिफारस केली आहे. राज्यात सर्वांत मोठी यादी जिल्ह्याची असल्याने यावर टीका होत आहे.

राज्याच्या आरोग्य विभागाने कोरोनाच्या महामारीत उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी, तंत्रज्ञापासून ते वॉर्डबॉयपर्यंत सर्वांचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्वोत्तम काम करणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांची यादी मागवली होती. मात्र, ही यादी करताना मर्जीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे सुचविण्याचा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे माजी महिला बालकल्याण समिती सभापती वंदना मगदूम, ज्येष्ठ सदस्य अरुण इंगवले यांनी आक्षेप घेतला. करवीर तालुक्‍यातून जी नावे पाठवली, त्यातील काही नावांवर आक्षेप नोंदवत माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत यांनी एका कर्मचाऱ्याला चांगलेच धारवेर धरले. यानंतर ही नावे बदलली. आता पुरस्कारार्थींची लांबलचक यादी केली असून, त्यात 78 नावांचा समावेश आहे. या वेळीही चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना डावलले जात असल्याची तक्रार होत आहे. 

डॉक्‍टरांचाही आक्षेप 
डॉ. योगेश साळे, प्रशासन अधिकारी नामदेव मोरे, डॉ. उत्तम मदने या त्रिस्तरीय समितीने नावांची शिफारस केली. तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी जी नावे दिली, त्यांची छाननी करून समितीने नावे अंतिम केली. यातील अनेक नावांवर आक्षेप आहे. काही अधिकारी पर्यटनाला गेल्याप्रमाणे काम करीत आहेत; तर काहींनी प्रसिद्ध कोविड सेंटरमध्ये गडबड केली. अशा अधिकाऱ्यांचा यादीत समावेश असल्याचे डॉक्‍टरांचे मत आहे. याबाबत त्यांच्याकडून लवकरच निवेदन दिले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

संपादन ः रंगराव हिर्डेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com