सध्या म्हैसाळ योजनेद्वारे दुष्काळी भागाला पाणी देण्यासाठी १७.४४ टीएमसी पाणी उचलण्यास मंजुरी असून, या बंधाऱ्याची क्षमता ३७१ दशलक्ष घनफूट आहे.
जयसिंगपूर : कृष्णा नदीवर (Krishna River) कनवाड (ता. शिरोळ) ते म्हैसाळ (ता. मिरज) दरम्यान एक टीएमसी क्षमतेचे बॅरेज (छोटे धरण) उभारण्यात येणार आहे. याचा लाभ २८ किमी परिसरातील गावांना होणार आहे. यासाठी दोन वर्षांपूर्वी १८६ कोटींचा निधी मंजूर झाला होता. काही दिवसांपासून कामाला सुरुवात झाली आहे.