
DPDC Meeting Kolhapur : कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला नेत्यांचे सुपुत्र चालतात कसे, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत खासदारपुत्र कृष्णराज धनंजय महाडिक आणि माजी खासदार पुत्र वीरेंद्र संजय मंडलिक उपस्थित होते. पालकमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत त्यांच्या मागे उभे राहिले. बैठकीला इतरांना प्रवेश नाकारला जातो. तेथे हे युवा कार्यकर्ते अपवाद का आहेत, या प्रश्नावर प्रशासन निरुत्तर झाले.