

Rankala Talim defeats Sandhyamath
sakal
कोल्हापूर : शाहू छत्रपती के.एस.ए. फुटबॉल लीग ‘ए’ डिव्हीजनमध्ये पहिल्या दिवशी रंकाळा तालीम मंडळाने संध्यामठ तरुण मंडळाला टायब्रेकरवर चार विरुद्ध तीन असे पराभूत केले, तर सुपर आठ गटात बलाढ्य पाटाकडील तालीम मंडळ ‘अ’ संघाला सम्राटनगर स्पोर्टस्ने गोलशून्य बरोबरीत रोखले.