Accident News : कुडित्रेत डिजिटल फलकच ठरला काळ; दुचाकी फलकाला धडकून शालेय विद्यार्थ्याचा मृत्यू

Kuditre Accident, Student Dies, Digital Hoarding; कुडित्रे येथे डिजिटल फलकाला दुचाकी धडकून १६ वर्षीय शालेय विद्यार्थी आर्यन भास्कर गंभीर जखमी झाला. सीपीआर रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
The digital hoarding in Kuditre where a two-wheeler collided, resulting in the death of a 16-year-old school student

The digital hoarding in Kuditre where a two-wheeler collided, resulting in the death of a 16-year-old school student

esakal

Updated on: 

कुडित्रे, : डिजिटल फलकाला दुचाकी जोरात धडकून झालेल्या अपघातात शालेय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. आर्यन माणिक भास्कर (वय १६, रा. दलित वसाहत, कुडित्रे) असे त्याचे नाव आहे. येथील चौकात

काल (ता. ३) रात्री दहाच्या सुमारास हा अपघात झाला होता. अपघातात आर्यन हा गंभीर जखमी झाला होता. त्याचा सीपीआरमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आर्यन रात्री दहाच्या सुमारास दुचाकीने घरी जात असताना बामण मळा कुडित्रे येथील डिजिटल फलकाला त्याची दुचाकी जोरात धडकली. या धडकेत त्याच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत झाली.

अपघातानंतर त्याला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com