Kurundwad ST Depot : सहलींचा हंगाम ठरला ‘सुपरहिट’; कुरुंदवाड आगाराच्या उत्पन्नात तब्बल १५ टक्क्यांची झेप!
School Tour Season Boosts : शाळांच्या सहलींचा हंगाम सुरू होताच प्रवाशांची संख्या वाढली; आगाराच्या दैनंदिन उत्पन्नात दीड लाखांची भर,वीस नवीन बसेस दाखल झाल्याने सेवा अधिक सुरळीत; पुणे, मुंबईसह लांब पल्ल्याच्या मार्गांवर वाढले उत्पन्न
जयसिंगपूर : सध्या सुरू असणारा शाळांच्या सहलींचा हंगाम आणि दिमतीला नवीन बसेस कुरुंदवाड आगाराच्या पथ्यावर पडल्या आहेत. आगाराच्या उत्पन्नात प्रथमच तब्बल १४.८७ टक्क्यांनी वाढ झाली आहे.