

Women visit government offices after KYC errors halt Ladki Bahin Scheme benefits.
sakal
कोल्हापूर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शासनाने अनिवार्य केलेली ‘केवायसी’ प्रक्रिया अनेक महिलांसाठी डोकेदुखी ठरली आहे. केवायसी प्रक्रियेत विचारलेल्या प्रश्नांच्या क्लिष्ट स्वरूपामुळे अनेक महिलांनी चुकीचे पर्याय निवडले, ज्याचा थेट परिणाम योजनेतून मिळणाऱ्या लाभावर झाला आहे.