विविध मागण्यांचे फलक हातात घेतलेल्या देवदासींचा हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. या ठिकाणी काही काळ निदर्शने करण्यात आली.
कोल्हापूर : सरकारने निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना (Ladki Bahin Yojana) २१०० रुपये अनुदान बँक खात्यात जमा करण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण करावे, देवदासींचा घरकुल प्रस्ताव मंजूर करावा, यासह विविध मागण्यांसाठी नेहरू युवा देवदासी विकास मंडळाच्या (Nehru Yuva Devadasi Vikas Mandal) माध्यमातून देवदासींनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. या ठिकाणी निदर्शने करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.