
Ichalkaranji Police : कोल्हापूर जिल्ह्यात 'मिशन झिरो ड्रग्ज' मोहिमेअंतर्गत शहापूर पोलिसांनी मोठी कारवाई करत १३४.०४ ग्रॅम ‘एमडी’ असा ६ लाख ७३ हजार २०० रुपये किमतीचा मेफेड्रॉन (एमडी) हा अंमली पदार्थ जप्त केला आहे. कोरोची गाव हद्दीत साईनाथ वजन काट्याजवळ सापळा रचून ऋषभ राजू खरात (वय ३०, रा. लोकमान्यनगर, कोरोची) याला अटक करण्यात आली. मागील आठवड्यात प्रतिबंधित इंजेक्शनचा साठा आणि आता या एमडी ड्रग्ज कारवाईने शहरात खळबळी उडाली आहे.