मुंबई उच्च न्यायालयाने कोल्हापुरात खंडपीठाला परवानगी द्यावी, यासाठी आपण उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना भेटणार आहोत. याबाबत पुन्हा एकदा विनंती करणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत जाहीर केले.
कोल्हापूर : ‘कोल्हापुरात खंडपीठ (Kolhapur Bench) झालेच पाहिजे’, ‘वुई वॉन्ट हायकोर्ट बेंच’, ‘सर्किट बेंच आमच्या हक्काचे’ यासह विविध घोषणा देत वकिलांनी काढलेल्या दुचाकी महारॅलीतून सर्किट बेंच मागणीकडे लक्ष वेधण्यात आले. जिल्हा व सत्र न्यायालयासमोरून सुरू झालेल्या रॅलीमध्ये शेकडो वकिलांसह विविध पक्ष, संस्था, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला. मुख्यमंत्री तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court) मुख्य न्यायाधीशांची भेट होऊन लवकरात लवकर तोडगा काढावा, अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला पाठविण्यात आले.