Sangli News : सनातन धर्माची जगाला आवश्यकता

डॉ. भागवत : टिळक स्मारक मंदिर शताब्दी प्रारंभानिमित्त व्याख्यान
sangli
sanglisakal

सांगली : विज्ञानामुळे प्रगती झाली तरी समाधान, शांती नाही. कट्टरता वाढली आहे. अशावेळी सगळ्यांना जोडणारा मध्यममार्ग तथागतांनी सांगितला आहे तो सनातन धर्माचा. आज जगाला त्याची आवश्‍यकता आहे. आपण स्वतंत्र आहोत. आपला ‘स्व’ स्पष्ट झाला की निःस्वार्थपणे पडेल तो त्याग करून देशाचे हित साधेल, असा देश उभा करू. तो जगावर अधिपत्य गाजवणारा, सर्वांना बरोबर घेऊन जाणारा भारत विश्वगुरू ठरेल, असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केला.

लोकमान्य टिळक स्मारक मंदिरच्या शताब्दी वर्षाच्या प्रारंभानिमित्त चिंतामणराव व्यापार महाविद्यालयाच्या मैदानावर सरसंघचालक डॉ. भागवत यांचे व्याख्यान आयोजित केले होते. व्यासपीठावर स्वागताध्यक्ष आमदार सुधीर गाडगीळ, संस्थेच्या अध्यक्षा मनीषा काळे, प्रकाश बिरजे आदी उपस्थित होते.

डॉ. भागवत म्हणाले, ‘‘समाजाला दिशा देण्याची नेहमीच आवश्यकता असते. आपल्या ध्येयाची दिशा कायम राहिली पाहिजे. स्वातंत्र्यापूर्वी सशस्त्र क्रांतीचा प्रवाह समाजमनात होता. त्याचवेळी समाज सुधारणा हे आद्य कर्तव्य आहे, हे धरून सुधारणेची चळवळही सुरू झाली ती आजही आहे. ज्यावेळी स्वराज्य हा शब्द उच्चारतो त्यामध्ये असणाऱ्या ‘स्व’ची कित्येकांना ओळख नसते. प्रत्येकातील ‘स्व’ जागृत करण्याचे कार्य लोकमान्य टिळक यांनी केले. स्वातंत्र्याची ऊर्मी ही स्वाभाविक गोष्ट आहे.

सनातन धर्माची जगाला आवश्यकता

कोणत्याही सुसंस्कृत समाजाला गुलामीत राहणे आवडत नाही.’’

ते म्हणाले, ‘‘वसुधैव कुटुंबकम ही भारताची धारणा आहे. सगळ्या समाजाला जोडणारा, सृष्टीची धारणा करणारा धर्म राहिला पाहिजे. सत्य, करुणा, तपस आणि शुचिता हे त्याचे चार स्तंभ आहेत. जगात शांती नांदावी म्हणून विविध प्रयत्न झाले. त्यातून ठोस परिणाम दिसू शकला नाही. मानसिक रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. हिंसा थांबलेली नाही. व्यक्तिकेंद्रित किंवा समाजकेंद्रित जीवनशैली अंगीकारल्यामुळे आज जग अस्थिर आहे. सनातन धर्माची जगाला तहान आहे. त्यामुळे जगाचे लक्ष भारताकडे आहे. देश परमवैभवाला नेण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न केले पाहिजेत. निरामय विश्व निर्माण करण्याची जबाबदारी नियतीने भारतावर सोपवलेली आहे. त्याकरिता प्रयत्नशील राहणे ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे.’’

भगवद्‍गीता हा भारतीयांचा ‘स्व’

डॉ. भागवत म्हणाले, ‘‘लोकमान्य टिळकांनी कार्याचे अधिष्ठान म्हणून भगवद्‍गीता स्वीकारली. अध्यात्म व चिंतन हे कर्तृत्वाचा, भाग्याचा पाया असतो. जीवनाला दिशा देण्याचे कार्य गीता करते. उपनिषद हे आपल्या चिंतनाचा परिपाक आहे. सर्व उपनिषदांचा सारांश म्हणजे भगवद्‍गीता आहे. तो भारतीय लोकांचा ‘स्व’ आहे. गीता युवापिढीने वाचली पाहिजे. जन्म-मृत्यूची भीती बाळगू नये. गीतेच्या तत्त्वज्ञानानुसार व्यक्ती आणि समाज यांना सामावून घेणाऱ्या समानत धर्माची तहान आज जगाला लागलेली आहे.’’

विचार-व्यवहाराची सांगड हवी

डॉ. भागवत म्हणाले, ‘‘राज्याचा त्याग करून चौदा वर्षे वनवास स्वीकारलेला मर्यादा पुरुषोत्तम राम हा आमचा आदर्श आहे. लोकमान्य टिळकांनीही स्वत:ची पर्वा न करता समाजहिताकरिता देह खर्चिला. गीतेत सांगितलेला कर्मयोग ते प्रत्यक्ष जगले. विचार व व्यवहाराची सांगड घालून कार्य करणाऱ्यांनाच समाजमनात अढळ स्थान मिळते. टिळकांनी ‘स्व’चे भान कधी सुटू दिले नाही. सत्याशी कधी तडजोड केली नाही. कोणत्याही परिस्थितीत ते त्याच समचित्ताने सामोरे गेले. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर असे वागणारे टिळक पहिलेच होते. बदलाची वेळ आली, तेव्हा त्यांनी गांधीजींकडे चळवळ सोपवली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com