कोल्हापूर: शहरातील ताराबाई पार्क येथे मंगळवारी वन विभागाने पकडलेल्या बिबट्याला आज संध्याकाळी त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. त्यापूर्वी त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली..त्याची प्रकृती उत्तम असून शरीरावर किंवा अंतर्गत कोणतीही जखम नाही. तो त्याच्या अधिवासात जाण्यासाठी योग्य आहे, असा अहवाल पशुवैद्यकांनी दिला. त्यानंतर वन विभागाने पुढील प्रक्रिया राबवून त्याची मुक्तता केली. .Kolhapur leopard : कोल्हापूरात बिबट्याचा थरार! दोन तासांच्या मोहिमेनंतर अखेर जेरबंद.ही माहिती उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी दिली. सुरक्षेच्या कारणास्ताव बिबट्याला कोठे सोडले, याची माहिती गोपनीय ठेवली आहे. शहरात मंगळवारी (ता. ११) दुपारी १२ वाजता ताराबाई पार्क परिसरात बिबट्या आला. त्याने चौघांना जखमी केले. .वनविभागाने त्याला जेरबंद केले. त्यानंतर त्याला बेशुद्ध केले. कर्मचाऱ्यांनी त्याला सोनतळी येथील कार्यालयात हलवले. काही तासांनंतर बिबट्या शुद्धीवर आला. त्याने पिंजऱ्यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न केले..Leopard Arrest Operation: बिबट्या आला अन् कोल्हापूरकर तर्राट! हायफाय वस्तीत कसा घुसला रांगडा पाहुणा? तीन तासात काय-काय घडलं.नंतर तो शांत झाला. संध्याकाळी बिबट्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. आज दुपारी पुन्हा त्याची तपासणी करण्यात आली. डॉ. ऋषिकेश वाळवेकर यांनी तपासणी अहवाल दिला. यामध्ये बिबट्याची प्रकृती चांगली असून तो नैसर्गिक अधिवासात जाण्यास योग्य आहे, असे नमूद आहे. .त्यानंतर नागपूर येथील वन विभागाच्या मुख्यालयात बिबट्याला मुक्त करण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला. तेथील मंजुरीनंतर बिबट्याला अधिवासात सोडण्यात आले. त्याला कोठे सोडले, याची माहिती वन विभागाने गोपनीय ठेवली आहे. हा बिबट्या पाळीव नसून तो जंगलातील आहे. त्याची पूर्ण वाढ झाली असून त्याचे वजन सुमारे ३० ते ३५ किलो आहे..जोतिबा, सादळे-मादळेतून आला?बिबट्या जोतिबा डोंगर, सादळे-मादळे घाट येथून निगवे, वडणगे गावातील उसाच्या शेतात लपून शहरात आला असावा. भक्ष्याचा शोध घेत तो आला; पण नंतर शहरातील रस्त्यांवर गोंधळला असावा, असा वन विभागाचा अंदाज आहे..बिबट्याचा चिकनवर तावबिबट्याला वन विभागाने ताब्यात घेतल्यावर रात्री त्याला ४ किलो चिकन देण्यात आले. सकाळीही त्याला ४ किलो चिकन दिले गेले. पुरेसे पाणीही बिबट्याला दिले होते..शहरात ४८ तास वावररविवारी रात्री बिबट्या पितळी गणपतीच्या जवळ असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसला. त्यानंतर मंगळवारी दुपारी तो ताराबाई पार्क येथील हॉटेल वुडलॅंडमध्ये आला. तो शहरातच ४८ तास असल्याचे वन विभागाचे म्हणणे आहे. या कालावधीत तो कोठे कोठे गेला, याची माहिती सीसीटीव्ही फुटेजद्वारे घेण्याचे काम वन विभागाने सुरू केले आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.