
Kolhapur Open Prison Breakout : अनैतिक संबंधातून प्रेयसीच्या मदतीने पतीचा खून केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या सुरेश आप्पासो चोथे (वय ३८, रा. चोथेवाडी, गडहिंग्लज) याने कळंबा खुल्या कारागृहातून पलायन केले. कारागृहाजवळील सर्व्हिसिंग सेंटरमध्ये ड्यूटीवर असताना ग्राहकाचीच मोटार घेऊन तो पसार झाला आहे. आज दुपारी तीनच्या सुमारास हा प्रकार घडला. त्यानंतर जिल्ह्यात नाकाबंदी करण्यात आली होती.