
गांधीनगर/ कोल्हापूर : चार महिन्यांपासून ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या मैत्रिणीने लग्नास नकार दिल्याने चाकूने भोसकून तिचा खून केल्याची घटना सरनोबतवाडी (ता. करवीर) येथे घडली. समीक्षा ऊर्फ सानिका भरत नरसिंगे (वय २३, रा. दत्त मंदिर रोड, कसबा बावडा) असे मृत तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी सतीश यादव (वय २७, रा. उन्ड्री, ता. पन्हाळा, सध्या रा. साकोली कॉर्नर, शिवाजी पेठ) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आज दुपारी साडेबाराच्या सुमारास हा प्रकार घडला.